प्रिय आई......
आई तु कशी आहेस हे नाही म्हणु शकत अथवा विचारु शकत.... या सगळ्याच्या पलिकडे तु गेली आहेस.
मला माहित आहे तु नाहीस तरी तुझे लक्ष माझ्याकडे आहेच अन आशिर्वाद कायमच माझी पाठीशी आहेत...
पण आई आयुष्यातल्या अनेक प्रसंगी तुझी खुप आठवण येते ग... त्यावेळी वाटते की तु प्रत्यक्ष माझ्याजवळ असायला हवी होतीस...
तु जरी फ़ार शिकलेली नसलीस तरी तुझे अनुभवाचे बोल कायमच मला मार्गदर्शक ठरलेले आहेत. तुझी शिकवण तर मी अमलात आणतेच आहे.
पण तीच शिकवण मी माझ्या मुलीत अन मुलात पण बाणवतेय अन ते देखील खरच खुप चांगल्या पद्धतीने आपले आयुष्य मार्गी लावत आहेत,
अन त्यासाठी धडपडत आहेत...
आई मला आठवतय ग की बाबा नसल्यामुळे तुझी सर्वच आघाडीवर होणारी धावपळ, होणारी मानसीक अन आर्थिक कुचंबणा मी पाह्यलीय...
आम्हाला सर्व सुखसोयी देताना तुझी होणारी जिवाची परवड मी पाहीलेली आहे.
आणि महत्वाचे म्हणजे आम्हाला एक माणुस म्हणुन जगायला शिकवलेस याबद्दल खरच मी तुझी कायम ऋणी आहे ग...
सारे आयुष्य कष्टात गेलेल्या तुला आयुष्याच्या शेवटी पण सुख मिळु नये याचे खुप वाईट वाटले ग...
आम्हा तिघींची लग्ने झाल्यावर तरी तु सुखाने जगावीस असे वाटत होते पण तुला झालेला आजार हा तुझा साथी ठरला...
संधीवातच्या दुखण्यात तुझे झालेले हाल बघवत नव्हते आणि तुझ्या वेदना मी घेउ शकत नव्हते....
आणि तु गेलीस ते पण तुझ्या नातीचे तोंड पहायच्या आधीच १५ दिवस...
वरती एकट्या असलेल्या बाबांची आठवण आली का ग तुला??? तुझी खुप आठवण येतेय ग आई...
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात ते काही खोटे नाही....
आई तुझ्या मागे मी तुझ्या इतर पिल्लांना म्हणजेच माझ्या दोन्ही लहान बहिणींना आईचे प्रेम देतेय पण त्याला तुझी सर नाही येणार ग....
तुझी लाडकी असलेली
आक्का

४ टिप्पण्या:
सौ. श्रध्दा ताई,
तूम्ही लिहलेल पत्र वाचून नक्कीच तूमच्या आईंना आनंद होईल.खूप छान पत्र आहे हे. वाचून मन गहिवरून आले.आज मला लक्षात आले की तूम्ही येवढ्या समंजस आणि सुस्वभावी कशा बनला आहात, अर्थात अश्या आईच्या गर्भात जन्म घेतलेले मूल वेगळे बनूच शकत नाही.आणि निश्चीतच तूमची मुले देखील तूमच्यासारखीच घडणार यात शंका नाही.
असेच उत्तोमोत्तम लिखाण लिहून तुम्ही माझ्यासारख्या अनेकांना तृप्त, विचारी आणि संस्कारी बनवत रहा हीच आपणास विनंती.
भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश वाळिंबे
९८२२८७७७६७
धन्यवाद निलेश
shraddha tumhi lihilele patra kharokarach aaichi aatavan karun denare bhavpurna patra aahe. vachun phar aanand zala. tumhi khup vichari v susanwadi aahat...
Rajendra Pawaskar
9820590840
धन्यवाद राजेंद्रजी...
टिप्पणी पोस्ट करा