मागील वर्षीची म्हणजे २००९ मधील दिवाळी... आम्ही सगळे पुण्याला जायचे ठरवलेले. मग पुण्यात जातच आहोत तर मुक्तपीठच्या जमेल तेवढ्या सदस्याना भेटायचे असे ठरवलेले. त्यानुसार आधीच मुक्तपीठवर आणि चॅटवर सौ ज्योती पळसुले आणि तिचे मीस्टर चिंतामणी (जिजु) यांच्याशी बोलुन ठरवले. भेटायचे ठिकाण म्हणजे पळसुले यांचे घर असे सर्वानुमते ठरल्यावर दिवस पण निश्चित केला. ज्योतीला म्हणले मी सकाळीच येते फ़ार तर मदतीला. ती हो म्हणाली आणि मी आणि माझी कन्या सकाळीच माझ्या मैत्रिणीच्या घरातुन १० च्या दरम्यान निघालो. यावेळेपर्यंत मी कधीच ज्योती आणि जिजुंना भेटले नव्हते. ते म्हणाले शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर येउन थांब माझी पिवळ्या रंगाची मारुती आहे. त्यांच्या बरोबर नरेंद्र कुलकर्णी याने पण येउन मला सुखद धक्का दिला. त्याला पण प्रथमच भेटत होते मी. घरी पोचल्यावर ज्योतीने मस्त स्वागत केले. जिजुंशी बोलता बोलता संध्याकाळी येणार्या सदस्याना फ़ोन लावणे चाललेले.पशा आमचा लाडका भाऊ खुप आजारी असल्याने येउ शकणार नाही असे समजल्याने खुपच नाराजी झाली पन अभिजीत कडुन त्याचा नंबर घेउन प्रथमच त्याच्याशी बोलले आणि यायचा आग्रह केला. बघु कसे जमते ते असे तो बोलला. तसेच अजुन पण फ़ोन चालुच होते.मी या सगळ्यांना भेटायला खुपच उत्सुक होते...
त्यानंतर ज्योतीने आवडीचे बटाट्याचे परोठे चटणी आणी दहीभात असा तिला साधा वाटणारा मेन्यु केला पण मला खुपच आवडला तो. दुपारी गप्पा मारत संध्याकाळच्या मेन्युची तयारी करत वेळ मस्त गेला. मी ४/५ दिवस ऑनलाइन नसल्याने अधुन मधुन जिजु मुपी चे वार्तांकन करत होते आणि हसवत होते. संध्याकाळची तयारी करुन झाल्यावर मी, ज्योती आणि माझी कन्या गौरी जरा तुळशी बागेत फ़ेरफ़टका मारुन आलो. ( तुळशीबाग म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आम्हा बायकांचा[:P])
संध्याकाळसाठी ईडली चटणी सांबार असा बेत होता. जोडीला फ़राळाचे पदार्थ होतेच,मी इकडुन बेसनाचे लाडु आणि चकली भरपुर नेलेली.संध्याकाळी आम्ही सगळेच आवरुन वाट बघत बसलेलो सगळ्यांची. अजुन माझे अहो, मुलगा, मैत्रिण आणि तिची कन्या पण यायचे होते.
यथवकाश आरती आली आणि तिच्या बोलण्यावरुन तीला ओळखले मी. तीपण किचन मधे आमच्या मदतीला लगेच हजर झाली. आणि आमच्या घरच्या मंडळींचे आगमन झाले. यांची आणि माझ्या मैत्रिणीची ज्योती आणि जिजुंशी ओळख करुन दिली... मग नरेंद्र दुपारी जे अर्ध्या तासात येतो परत असे सांगुन जे गेलेला त्याचा पत्ताच नव्हता तो उगवला. मागोमाग अभिजीत आणि अक्षु पण आले. पशाला फ़ोन केला तर म्हणाला मी दवाखान्यात आहे आलोच १५ मिनीटात. १५ मिनीटात खरोखरच तो आला... पशाला पाहिल्यावर खरच काय वाटले ते नाही फ़ारसे शब्दात मांडता येणार पण त्याच्या लिखाणावरुन त्याच्याबद्दल जी अपेक्षा केलेली तसा तो नव्हता एवढे मात्र निश्चित... सुरुवातीला एकदम मितभाषी गप्प वाटणारा पशा नंतर मात्र जे सुरु झाला ते जाइपर्यंत... अभिजीत बद्दल तर काय बोलु? त्याच्यासारखा माणुस आपला मित्र आहे आणि आपल्याशी बोलतोय हेच माझ्यासाठी खुप होते. एवढा हुशार, बरेचसे मोठ्या मोठ्या व्यक्तींकडुन सत्कार झालेला माणुस बोलायला एकदम नम्र आणि खुप उत्साही, प्रचंड दंगेखोर... त्याच्या लपलेला एक लहान खट्याळ मुलगा जाणवत होता पदोपदी...एरवी मुक्तपीठवर सतत बडबड करणारा अक्षु मात्र खुपच शांत बसलेला की एखाद्याला सांगितले तरी खरे वाटणार नाही की हा मुलगा एवढी बडबड करतो...सगळ्या खायच्या पदार्थांचा आस्वाद घेत सगळी मस्त गप्पा मारत होती.. पशा फ़ल्त बाटलीभर लिंबुसरबत पिला कारण त्या शिवाय त्याला काहीच खायचे प्यायचे[:P] नव्हते. जिजु मधे मधे कॅमेरा सरसावुन फ़ोटो काढत होतेच. यांची परत एकदा सगळ्यांची ओळख करुन दिली...आणि मग आम्ही सगळेच ९ ते ९.३० च्या दरम्यान तेथुन बाहेर पडलो...त्यादिवशीची भेट एकदम मस्त अविस्मरणीय झाली...