बुधवार, २८ डिसेंबर, २०११

मुक्तपीठ स्नेहभेट वृतांत...


 मुक्तपीठ स्नेहभेट वृतांत................



खुप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आजचा सुदीन उजाडला एकदा..... पुण्यात ६.३० ला रेल्वेतुन उतरल्यावर एका पाहुण्यांकडे जायचे होते अन तेथुनच फ़्रेश होऊन मी डेक्कन्च्या हॉलवर येणार होते .... पण ज्योतीच्या घरुनच निवेदीताचा फ़ोन आला की अग इकडेच ये आपण मिळुनच जाउ अन मी तिच्याकडे गेले पण पुण्यनगरीत येउन एक काम विसरले तर मला सांगलीत कशी एंट्री मिळेल???? अगदी बरोबर ओळखलेत... लाडकी तुळशीबाग.... तर लेकीच्या डिमांड्स होत्या काही ते काम निपटुन मी जिजु अन ज्योतीकडे गेले...राहुलचा फ़ोन येउन गेलेला होता अन मी आल्यावर परत एकदा आलेला मग मात्र गडबड करत तिथुन १० मिनीटातच बाहेर पडलो....


डेक्कन जिमखान्यावर सर्व सदस्यांचे स्वागत अशा पद्धतीनेही करण्यात आले.....




शेजारील फ़ोटोत...... मी, अविनाशकाका,विपुल,ओंकार, चिंतामणी पळसुले....

 
                      


<-------  निवेदीतासह आम्ही


राहुलने आणि अविनाशकाकांनी आमचे स्वागत केले...... अन डेक्कन जिमखाना क्लबने पण.......
वरच्या मजल्यावर सगळे गेलो... हळु हळु एक एक सदस्य यायला सुरुवात झाली आणि काहींना फ़ोन करणे चालु झाले... कोण केव्हा येत आहे याचा अंदाज घेणे अन उशीर होत असेल तर लवकरात लवकर यायचा प्रेमळ आदेश वजा विनंती.....

सुरुवातीला आम्ही काहीच जण होतो तेव्हा मी आणलेल्या चकलीचा आस्वाद घेणे
चालु झाले... अन खवैय्ये अविनाशकाका त्यांच्याकडुन मिळालेली चकलीची तारीफ़
लाजवाब.








आम्ही हॉलमधे स्वागत फ़लक लिहीत असताना ओंकारने एक छान सजेशन दिले....
त्याप्रमाणे त्या फ़लकावर सर्वांच्या स्वाक्षार्‍या घेण्याचे काम केले तरीपण
बहुदा काहीजणांनी केल्याच नाहीत स्वाक्षर्‍या... कोण आलय कोण नाही
याची वारंवार बाहेर राहुलकडे चौकशी चालुच होती.... राहुलने गीताप्रवचने हे
"प्रबोधक पुण्याचा" यांनी दिलेले पुस्तक सर्वांनाच एंट्री केल्याक्षणीच
दिलेले होते...प्रबोधकजी तुम्ही यायला हवे होते.... असो फ़िर कभी
मिलेंगे.... सगळे वाट पहात होतो ते सम्राट अन अभिदाची... कार्यक्रम चालु
करायचा तर समुहाचे आमा आणि मामा नको का? आणि लवकरच सम्राट अन संतोष धायबर
यांचे आगमन होताच चहा घेउन कार्यक्रमाला सुरुवात झाली....



आजपर्यंत कधीच मोठ्या अथवा छोट्या मॉबसमोर मी माईक घेउन बोलले नव्हते... आपण बोलु शकु का नाही असा मनात आलेला विचार मी मीनल अन युवी ला बोलुन दाखवला अन दोघांनीही छान शाब्दीक सपोर्ट दिला.... युवी तर म्हणाला दिदी काही काळजी नको करुस अन आजिबात घाबरु नकोस... बिन्दास बोल जशी मुपीवर असतेस तशीच..... मी अन पुजा तुझ्या शेजारीच उभे असु..... यस युवी तु अन पुजा खरच माझ्या शेजारी असल्याचा फ़ील झाला अन मी काही बोलु शकले..... आता सगळ्य़ांना ते कसे वाटले माहीत नाही.... पण आवडले असावे असा माझा अंदाज आहे.....

तर चला परत एकदा अनुभवुयात का स्नेहभेट?????

    
नमस्कार मित्रांनो
मी श्रद्धा..... आपल्या समूहाची नियंत्रिका..
आजच्या समूहाच्या स्नेह्भेटीत सर्वांचे मनपूर्वक स्वागत  करते ....
खरे सांगायचे तर समूहावर आपली भेट दररोज अगदी नियमीतपणे होत असते .
विवीध धाग्यांवरील अनेक प्रतिक्रियातून आपण एकमेकांशी सवांद आपण साधत असतोच ..
पण अनेक दिवसांच्या प्रतिक्षेतुन आज त्या संवादाला मुर्त रुप देत आपण भेटतोय ..
आजवर शब्दांमधून भेटलेले आपण आज प्रत्यक्षात भेटतोय याचा आनंद वेगळाच आहे..
अन तो मला तुम्हा सर्वांच्या चेहर्‍यावर दिसत आहे... आजच्या भेटीत सर्वांचा सहभाग आणि उत्साह
हा जवळ जवळ २ महिन्यांपुर्वीपासुनचा आहे, जेव्हा भेटीचा विषय निघाला...
काहींनी दूरचा प्रवास पार केला आहे...तर काहींनी महत्वाच्या कामांमधून वेळ काढून आज उपस्थिती दर्शवली ..
प्रत्येकानेच रोजच्या रुटीन आयुष्यातून वेळ काढून या भेटीत सहभाग नोंदविला ...
म्हणून आलेल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत ...
विशेषतः सम्राटदाचे

आपल्या सर्वांना मैत्रिच्या नात्यात एकत्र जोडणारा आपला समूह  अगदी नावाप्रमाणेच आहे ..
समूहाला एक इतिहास आहे .... अनेक आठवणींची जोड आहे ...
सूत्रबद्ध नियंत्रण आणि चौफेर लिखाणाची विविधता आहे ..
म्हणून आजही आपला समूह आपली वेगळी विशेषता जपून आहे...नावाला जागणारा आहे ..
मुक्तपीठ ..!!!!!!!!  .खरच नावाप्रमाणेच
मुक्त विचार मांडायचे एक व्यासपीठ ...
हक्काने मनातले विचार येथे मांडता येतात ..
पण याला नियमांची विशिष्ट चौकट सुद्धा आहे ...
अनेक वेळा समूहावर वावरताना नियमांकडे दुर्लक्ष होऊन चर्चा वाद ... विवादाकडे झुकत असतात ...
असे शाब्दिक विवाद मैत्रीत कटुता आणत असतात .... पण अशा भेटी समुहातील वातावरण
प्रफुल्लीत करतात ..
चला तर मग असे शाब्दिक मतभेद...मते मतांतरे यांना फाटा देत नव्या मैत्रीची सुरवात करुन
आपण असेच मिसळून जावूया ...
आनंदाचे  काही क्षण एकमेकांसोबत जगूया ...धम्माल मस्ती मौज मज्जा ...अगदी मनाला नवा तजेला देवूया.
या सुख दुखाची देवाण घेवाणीत नव्या विचारांची नवी दिशा मिळेल आणि आठवणींच्या पानात आजच्या आपल्या स्नेहभेटीची एक छान आठवण लिहली जाईल ......

आपल्या समुहातल्या प्रत्येकालाच ह्या भेटीची उत्सुकता लागली होती... त्यामुळे समुहातील अनेक सभासद
जरी अनुपस्थित असले तरी शुभेच्छा रुपाने ते आपल्या सोबतच आहेत आणि त्यांच्या समुहाप्रती असलेल्या
आपुलकीची आनंददायक आठवण ठेवत ह्या कार्यक्रमाची सुरवात करूया....
अशी प्रस्तावना करत...... आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली...... 




प्रथम सम्राट फ़डणीस यांनी हा समुह स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे त्यावर चार शब्द
सांगुन स्वताची थोडक्यात ओळख करुन दिली....




यानंतर राहुलने चार्ज घेत अन एक एक नाव पुकारत सर्वांना ओळखीसाठी पाचारण केले...


प्रत्येकानेच आपण स्वता मुपीवर साधारण केव्हा आलो अन का आलो अन मुपीशी एवढे का अ‍ॅटॅच आहोत हे सांगितले..
अभिजीत थिटे यांचे आगमन या ओळख कार्यक्रमाच्या दरम्यानच झाले.... अभिदाने आताची नवी पिढी सोशल साईट्स वर किती आणि का रमलीय त्यांचे विचार काय अन कसे आणि ते तसे का आहेत याबद्दल सांगितले... आणि त्याने केलेल्या सर्व्हेच्या आधारे हे मत मांडले...
 याचा व्हिडीओ खरच पहा तुम्ही.....



या कार्यक्रमाच्या दरम्यान विपुल जेव्हा स्वताची ओळख द्यायला गेला अन बोलायला लागला तेव्हा बाप रे याला आता थांबवायचे कसे असा प्रश्न माझ्या अन निरंजन काकांच्या समोर उभा राहिला कारण वेळ कमी अन सर्वांच्याच पोटात भुकेने कावळे ओरडायला लागलेले...



अविनाशकाकांनी ओळख करुन दिल्यावर ताबडतोब एक प्रश्न समोर आला की काका मुपीवर तुम्ही एवढे धागे काढता तर तुम्हाला विषय कसे सुचतात??? तर अत्यंत हजर जबाबी असलेल्या काकांनी उत्तर दिले की आता वेळ जात नाही, काम नसते रिटायर्ड मनुष्य मी तेव्हा सर्फ़ींग करत असताना विवीध विषय सापडतात अन मग मी ते मुपीवर आणतो..... सर्वच सदस्यांनी त्यांना हसुन अन टाळ्या वाजवुन त्यांना अजुनच फ़्रेश केले...







 प्रसन्ना जोशी याची मात्र चुळबुळ चाललेली कारण त्याच्याकडे वेळ कमी होता अन त्याला जेवुन बंगलोरची गाडी पकडायची होती... या बिझी शेड्युलमधुन प्रसन्ना तु आलास त्याबद्दल तुझे आभार मानुन तुला परके नाही करत....













ओंकारने सम्राटदाला काही सजेशन्स दिल्यात..... बघुया आता त्यावर कसे काम चालु करायचे....सम्राटदाकडुन तरी ग्रीन सिग्नल मिळालाय....













मागच्या स्नेहभेटीचे यजमानपद सांभाळलेले श्री. चिंतामणी पटवर्धन उर्फ़ मामा आणि सौ शिल्पा पटवर्धन उर्फ़ मुपीची मामी यांनीही वेळ काढुन थोडावेळ का होइना पण हजेरी लावली आणि मुपीवर अ‍ॅक्टीव्ह व्हायचे आश्वासन दिले...


















स्वातीने पण आपली तब्बेत संभाळत कार्यक्रमाला हजेरी लावली याबद्दल खरच तिचे मनापासुन कौतुक आणि प्रसन्ना तर काय उज्जैन हुन लेकीला घेउन आलेली अन तिची लेक पण सर्वांच्यात एकदम झकास मिसळुन गेली...या शिल्पुने पण आमच्या सह्यांमधे स्वताची एक सही केलीय....
गुलाबी ड्रेस घातलेली स्वाती.........---------->



















ओळख कार्यक्रमाच्या दरम्यान सिद्धेशचे पण आगमन झाले... उशीर झाल्याबद्दल त्याला सारखी चुटपुट लागुन राहिलेली... पण तो आला हे आमच्यासाठी खुप महत्वाचे होते... सिद्धेश तुला भेटुन खरच खुप छान वाटले....



फ़्लर्ट्रींग करण्यासाठी मी खरे तर ऑर्कुटवर आलेलो पण आता मात्र छान चर्चा करायला अन वाचायला मुपी आवडते असे प्रामाणीकपणे सांगणारा सतीश खरच मनापासुन भावला....
कट्टर विरोधक अन तितकीच मैत्री असलेल्या कौस्तुभची आठवण नाशिकचा पुणेकर उर्फ़ योगेश चौरे याने काढत कौस्तुभच्या आगामी नेतेपणाचीच झलक त्याच्या मुपी भेटीच्या आश्वासनात दिसली असे मत दिलखुलास दिले... ( योगेशचा फ़ोटो अ‍ॅव्हेलेबल नाहीय...)

समुहावर एवढी बडबड करणारा गौरव सरदारजी तिथे मात्र शांत शांत वाटला... पण मीनल म्हणते तसा तो एक खरच गोड मुलगा आहे... पुढच्या भेटीला सगळी बडबड वसुल......... हो ना गौरव????         -------------->            






केतन तर काय बाबा...... मस्तच.... सगळ्या कार्यक्रमाच्या फ़ोटोंची जबाबदारी त्याच्याकडे अन माझ्या कॅमेर्‍याची पण


सुनील जोशींनी नागपुरहुन हजेरी लावलेली... तर निरंजनकाका ठाण्याहुन आलेले. तरुणांना लाजवेल असा उत्साह काकांच्यात...

<----------सुनील जोशी









                                                                                  
मॅगी गर्ल रश्मीला आणि नव्यानेच मुपीवर दाखल झालेल्या संगिता ला भेटुन तर ही मुपीवर नवी आहे आणि आम्ही नव्यानेच भेट्तोय असे वाटलेच नाही... रश्मीला तर ओळख करुन देताना अन मुपीबद्दल बोलताना काय बोलु अन काय नको असे झालेले.... तिचे मिस्टर पण कार्यक्रमात त्यात उत्साहाने भाग घेत होते...       रश्मी ------------>                     



<------------------- निरंजन प्रधान   




















साधना ---------------->











                                                                                                                                                                                                                                                                                                  



<---------------- मीनल



सर्वांना फ़ुले अन या भेटीची आठवण म्हणुन ग्रीटींग देण्याचे काम ओंकारने स्वताहुन आनंदाने स्विकारले... गी ग्रिटींग्ज तयार करुन आणण्याची कल्पना आणि जबाबदारी दीपक माने यांची... थॅंक्स टु दीपक... खुप लांबुन ड्राइव्ह करुन येउन पण तितक्याच उत्साहात दीपक सर्वांच्यात मिसळुन गेला....
तर अशा सर्वांच्या ओळखी झाल्यावर आम्ही सर्वच वरती टेरेसवर जेवायला गेलो...

लेमन सुप...प्रथमच चव पाहिलेली......खरच मस्तच.... अगदी नाविन्य असलेले पदार्थ जिजु ( चिंतामणी पळसुले ) अन ज्योतीने सिलेक्ट केलेले अन सर्वच व्यवस्था पण सुंदरच .... याबद्दल जिजुंचे खास आभार....

खाली चालु असलेल्या टुर्नामेंट्स बघत तरुण मंडळी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेत होती.... प्रत्येकजण थोड्या थोड्या वेळानी वेगवेगळ्या टेबल्स वर जाउन एकमेकांची चौकशी करत होते...


 

जेवण झाल्यावर परत खाली हॉलमधे येउन पुढचा कार्यक्राम..... अभिदा अन संतोषच्या पुस्तकाबद्दल अन चिंतामणी पळसुले यांच्या खेळाडु म्हणुन आणि इतरही बर्‍याच असलेल्या अ‍ॅक्टीव्हिटीज बद्दल निरंजनकाकांनी गौरवपर भाषण करुन अभिदाला त्याच्या पुस्तकाबद्द्ल काही सांगण्यास सांगितले.... एवढ्यात आपला सर्वांचा लाडका पशा उर्फ़ परा म्हणजे परिकथेतील राजकुमार उर्फ़ मृत्युंजय याचे आगमन होताच सर्वांनीच टाळ्या वाजवल्या...



या सर्व कार्यक्रमा दरम्यान डॉ. युवराज पाटील, पुजा पवार, अश्विनी ( कलिंगडाची टोपीवाली) यांनी परदेशातुन तर भारतातुन संतोष लचके, मयुरी -मस्तानी आणि पारसकुमार यादव यांनी फ़ोन करुन बर्‍याच सदस्यांशी बोलुन आपली अप्रत्यक्ष हजेरी या भेटीला लावली.... तुम्हा सर्वांचे मनापासुन आभार.... पण सुधीर तुला मात्र आम्ही मिस केले खुप.... तुझा फ़ोन येइल असे वाटले होते....

या सर्व कार्यक्रमा दरम्यान डॉ. युवराज पाटील, पुजा पवार, अश्विनी ( कलिंगडाची टोपीवाली) यांनी परदेशातुन संतोष लचके आणि पारसकुमार यादव यांनी फ़ोन करुन बर्‍याच सदस्यांशी बोलुन आपली अप्रत्यक्ष हजेरी या भेटीला लावली.... तुम्हा सर्वांचे मनापासुन आभार.... पण सुधीर तुला मात्र आम्ही मिस केले खुप.... तुझा फ़ोन येइल असे वाटले होते....

या सर्वात वेळ कशी संपली समजलेच नाही.... मीनलच्या भाषेत बोलायचे म्हणले तर पोट भरले होते पण मन नव्हते भरले....हॉलमधुन बाहेर पडल्यावर काहींना जायची गडबड होती ती मंडळी आमचा निरोप घेउन बाहेर पडली आणि आम्ही राहिलेली सर्वजण खाली झाडांच्या सावलीत मस्तपैकी खुर्च्यांवर तळ ठोकुन गप्पा, गाणी चालु झाली... संदीपने एक झक्कास मराठी गाणे म्हणले... राहुलने पण गाणे म्हणलेच पण इतरांच्या सुरात सुर मिसळुन पण तो मस्त साथ देत होता... स्वाती ने ही चाल तुरु तुरु या गाण्याचे कडवे उलटे पण त्यात चालीत म्हणुन दाखवले.... अपर्णाने मेंदीच्या पानावर हे गाणे म्हणुन सर्वांची वाहवा मिळवली....तर ओंकारने "गाडी सुटली रुमाल हलले..... हे भलते अवघड असते कुणी दुर दुर जाताना" हे गाणे म्हणुन आपली आता निरोपाची वेळ जवळ येत चालली याची नको असलेली जाणीव करुन दिली.... सुनील ने त्याच्या कवितांचे प्रकाशीत झालेले "व्यक्त मी अव्यक्त मी" हे पुस्तक सर्वांना भेट दिले....
तसेच मुपीवर फ़ारसे अ‍ॅक्टीव नसलेल्या पण अगदी सर्वांच्यात जुनाच असल्याप्रमाणे भारत मुंबैकर हा अगदी सहजतेने मिसळुन गेला.....



परत एकदा चहा घेउन अन थोड्या गप्पा मारुन जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेत सर्व मंडळींची पांगापांग झाली.... व्यक्तीशः माझ्या बाबतीत बोलायचे खरे तर माझा पाय तिथुन निघत नव्हता पण मला पुढे खोपोलीला जायचे असल्याने मी राहुलबरोबर निघाले... त्याने मला अन माझ्या मिस्टरांना वाटेत पिकप करुन चिंचवडला सोडले.... रात्री सतीश आणि संदीप यांचा मुंबैत सुखरुप पोचल्याचा एस एम एस आला अन खरच छान वाटले की काही माणसे खरच आपण कमावलीत याचा आनंद झाला.... या दोघांना एस एम एस करुन कळवावे वाटले यातच मुपीचे यश आहे असे म्हणता येइल... पण सॉरी रे मित्रांनो तुमच्या एस एम एस ला मी नाही रिप्लाय देउ शकले कारण मी एका वेगळ्याच वातावरणात होते...


अजुनही रविवारच्या १८ डिसेंबरच्या स्नेहभेटीचा हॅंगओव्हर गेलेला नाहीय तरीपण आता पुढच्या स्नेहभेटीची आस सर्वांनाच लागुन राह्यली आहे हे नक्की...






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: