मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

नमस्कार...

सगळ्यांचे ब्लॉग आजपर्यंत वाचत होते आणि आहेही. बर्‍याच जणांनी मला विचारले की तुझा ब्लॉग नाहीय का? पण मी काही लेखिका नाहीय की कविता करत नाही तर करायचाय काय ब्लॉग? या दिवाळीत नेहमीप्रमाणेच कचकुन ५ दिवसाची सुट्टी मिळाली कंपनीला. डोक्यात दिवाळीचे विचार तर होतेच पण माझ्या आयुष्यात नव्यानेच प्रवेश केलेल्या इंटरनेट जगताचे विचार पण होतेच. त्यातच एक विचार आला की आपण आपला ब्लॉग तयार करायचा विचार एका क्षणात चमकुन गेला. पण लिहायचे काय? आपल्याला जे आवडेल ते लेखन/कविता? छे आजीबात नाही...मग एक नवाच विचार सुचला मला. मी नेटवर भेटलेल्या बर्‍याच व्यक्तींना प्रत्यक्ष भेटते. तर अशा व्यक्तीना भेटल्यावर मला काय वाटते याचे शब्दांकन इथे करावे असे सहजच मनात आले आणि आज ते अमलात आणायला सुरुवात केली.

तसेच माझ्या या ब्लॉगवर मी स्वता काढलेली छायाचित्रे तसेच काही पाककृती छायाचित्रांसहीत देणार आहे.

1 टिप्पणी:

प्रमोद देव म्हणाले...

सुस्वागतम्‌ श्रद्धा!
हळूहळू सगळं जमेल. चिंता करू नकोस.