बुधवार, ७ ऑगस्ट, २०१३

माझा मिकी





सर्वप्रथम थॅंक्स टु अंतुदा....

मुक्तपीठवरील कुत्रा पाळायचा विचार आहे?? हा धागा आणि बरेचदा अंतुदाशी फ़ोनवरील अन चॅटवरील बोलणे यातुन मी अन माझ्या कन्येने अंतुदाकडुन ल्हासा अ‍ॅप्सो या जातीचे कुत्र्याचे पिल्लु घ्यायचे ठरवले. घेताना माझ्यामते तसा मी बराच विचार केला होताच. फ़्लॅट असल्याने कुत्रे पाळु शकु का हा विचारही मनात होताच.  कन्या आता फ़ारशी आमच्या बरोबर कुठे बाहेर यायला उत्सुक नसते. तर तिचा सोबती म्हणुन आम्ही अंतुदाकडुन एक बच्चा घेतला.  पाहता क्षणीच हे पिल्लु खुप आवडुन गेले.

हा अंतुदाकडे असलेला माझा मिकी.



मी जेव्हा याला घरी आणले त्यानंतरच्या काही दिवसात तो असा झालेला...






अजुन काही दिवसांनी असा...





मग त्याचे केस वाढले... थोडे डोळ्यावर यायला लागले....









आता तो ५ महिन्याचा झाला होता अन आम्ही हळु हळु त्याला बाहेर नेणे सुरु केले. प्रथम तो चांगलाच बिचकत होता. त्याला बांधलेल्या लिशला झटका द्यायचा. मला नाही यायचे बाहेर अशा गर्दीत असे सुचवायचा... पण हळु हळु त्याला बाहेरच्या जगाची सवय होत गेली. मग त्याला स्टेडीयमच्या ग्राउंडवर न्यायला चालु केले.


काही ठिकाणी त्याला उचलुन घ्यावे लागायचे. पण जास्त मजा यायची अन अजुनही येतेच त्याला बाहेर न्यायला. मिकीला जेव्हापासुन बाहेर नेणे चालु केले तेव्हा पासुन बरेच काही मजेशीर अन कॉमन प्रश्न. हा खरा डॉगी आहे का? आम्हाला टेडीच वाटला. त्याला दिसते का??  एवढे केस डोळ्यावर आहेत तर कसे दिसते? आंघोळ रोज घालता का? त्याच्या डोळ्यावरचे केस कापत नाही का???? पण काही म्हणा तुमचा डॉगी खुप क्युट आहे हं....

अशा रितीने आमचा मिकी आमच्या एरीयात पॉप्युलर झाला. दरम्यानच्या काळात सांगलीत इंतरनॅशनल लेव्हलचा डॉग शो झाला. पपी डॉगमधे १०१ % त्याला पहिला नंबर मिळाला असता पण अंतुदाच्या सुचनेनुसार त्याला सध्या प्रेझेंट करायचे नव्हतेच. नुसतेच त्याला घेउन जाऊन आलो.
तर तिथे असलेल्या इतर कुत्र्यांपेक्षा याच्या मागेच सर्वजण अगदी फ़ोटोग्राफ़रसहीत.

हळु हळु त्याचे केस वाढायला लागले. कधी कधी त्याच्या केसांच्या शेंड्या घालुन बाहेर घेउन जाऊ लागलो. तर अजुनच त्याचे कौतुक. येणारे जाणारे आता थोडावेळ थांबुन आपल्या मोबाईलवर त्याचे फ़ोटु घेउ लागले. आम्ही नुकतेच सांगलीला रहायला आलेलो असल्याने आम्ही कुणाला अन आम्हाला कुणी फ़ारसे ओळखत नाहीत पण मिकी मुळे आज सर्वजण आम्हाला ओळखु लागलेत. फ़ीलींग प्राउड. गेल्या महिन्या दोन महिन्यात त्याला  पावसामुळे बाहेर नेले नाही तर वाटेत भेटणार्‍या बर्‍याच जणांनी काय हो मिकी कुठाय दिसला नाही बरेच दिवसात असे विचारले. जवळच एक आयुर्वेदीक दवाखाना आहे तिथल्या रिसेप्शनीस्टने पण विचारले काय हो तुमचा मिकी दिसला नाही बरेच दिवसात...











 


किचन मधे असा छान लुडबुडत असतो.... त्याचा खाऊ मिलवण्यासाठीची त्याची धडपड...











काल सोमवार मला सुट्टी अन पाऊसही नव्हता म्हणुन त्याला जरा पेट केअर क्लिनीक मधे घेउन जायचे होते. म्हणुन मी त्याला घेउन बाहेर पडले. तर काय रे मिकी कुठे गायब झालेलास इतके दिवस अशा अर्थी कमेंट्स आणि कौतुक भरल्या नजरा.

दवाखान्यातुन बाहेर पडले अन रिक्षाची वाट पहात थांबले अन २ मिनीटात माझ्या समोर एक शेअर रिक्षा उभी राहिली. अन रिक्षावाला म्हणाला बसा मॅडम, आज खुप लांब घेउन आलात त्याला. म्हणलं हो दवाखान्यात आणलेले रुटीन चेक अप ला. चला घरापर्यंत सोडतो तुम्हाला... मी आश्चर्यचकीतच...म्हणला गावभागातच राहता न तुम्ही??? मी बघतो नेहमी याला फ़िरायला घेउन येता ते... तर खरच मला खुप आनंद होतोय की मिकी एवढा फ़ेमस झालाय. अंतुदा Thanks to you again... feeling sooooo proud




सध्याचा मिकी

















दिनांक २० जानेवारी २०१३ ला आमचा मिकी गडहिंग्लजच्या इंटरनॅशनल डॉग शो मधे पार्टीसिपेट झाला. त्याला तिथे बेस्ट ऑफ़ ब्रीडचे पहिल्या नंबरचे बक्षिस मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: